उद्धव ठाकरेंनी 20 मे लाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, पण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 हुन अधिक समर्थक आमदारांसह बंडखोर केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी 20 मे लाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती नाकारली आणि आता त्यांनी बंड केलं असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

युवासेनेच्या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, २० मेला मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेना वर्षावर बोलवलं होते आणि त्यांना विचारले होते तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? पण तेव्हा त्यांनी नाही म्हणत नाटक केलं. आणि टाळाटाळ केली.

तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात. तुम्हाला पळून जाणे शोभत नाही. अस आदित्य ठाकरे म्हणाले. ज्यांना मंत्रीपदे दिली, मान सन्मान दिला त्यांनीच घात केला. पण आता सगळी घाण निघून गेली आहे. बंडखोरीनंतर शिवसेनेला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Comment