औरंगाबाद प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी नक्कीच करणार, पण कर्जमुक्त झाल्यानंतर त्याला मला चिंतामुक्त करायचं आहे असे विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान जगातली महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीला शक्ति देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही.
-मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/urTTBlcUiw— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 9, 2020
“शेंद्रा येथे भूमिपुत्रांना शिकविण्यासाठी आपले सरकार कौशल्य विकास संकुल उभारणार असल्याचे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. तसेच “बिडकिन येथे ५०० एकरवर आपण अन्नप्रक्रिया उद्योग केंद्र उभारणार आहोत. आणि माझी इच्छा अशी आहे की जवळपास १०० एकर महिला उद्योजकांसाठी आरक्षित असली पाहिजे. असं मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान जगातली महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीला शक्ति देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द ठाकरे यांनी दिला. आपल्याकडे जे कौशल्य आहे, जी बुद्धिमत्ता आहे, त्याचा योग्य वापर आपण करू शकलो तर संपूर्ण जगाची बाजारपेठ जिंकू शकू एवढी हिंमत, ताकद आणि कौशल्य माझ्या हिंदुस्थानात, माझ्या मराठवाड्यात नक्कीच आहे.” असा विश्वासदेखील मुख्यमंत्रांनी बोलून दाखवला.
हे पण वाचा –
ताफा थांबवून मुख्यमंत्री धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला
पॉर्न पाहणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सकडून होऊ शकते तुमची रेकॉर्डिंग
पुण्यातील मनसे कार्यालय भगव्या रंगात रंगले; मनसे हिंदुत्वाकडे वळणार?
धोनीची जागा मी कधीच घेऊ शकत नाही – हार्दिक पांड्या
नेहा कक्करला ‘या’ गायकाने घातली लग्नाची मागणी;नेहाच्या घरच्यांनी देखील दिला होकार