Uddhav Thackeray On Maratha Aarakshan : मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? अवघड प्रश्नावर ठाकरेंचं उत्तर चर्चेत

Uddhav Thackeray On Maratha Aarakshan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uddhav Thackeray On Maratha Aarakshan । मराठा समाजाला ओबीसी कोट्यातुनच आरक्षण मिळावं हि मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईला गेले आहेत. आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असून संपूर्ण मुंबईत आज भगवं वादळ बघायला मिळतेय. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? याबात तुमचं मत काय आहे? असा सवाल केला असता उद्धव ठाकरेंनी सावध प्रतिक्रिया देत आरक्षणाचा चेंडू सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात टाकला. माझ्या बोलण्याचा काहीच अर्थ नाही, कारण मी सत्तेत नाही. त्यामुळे यावर सत्ताधार्यांनीच बोललं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी (Uddhav Thackeray On Maratha Aarakshan) सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. आरक्षणासाठी मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मुंबई मराठी लोकांची राजधानी आहे. आंदोलक दहशतवादी नाहीत, आणि जे आंदोलन करण्यासाठी आले आहेत ती आपली मराठी माणसं आहेत. मराठा समाजाला नाईलाजाने न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले?

मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? Uddhav Thackeray On Maratha Aarakshan

यादरम्यान, मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? असा अडचणीत टाकणारा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. मात्र ठाकरेंनी स्ट्रेट ड्राइव्ह मारत हा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडे टोलवला. ही सगळी जबाबदारी सरकारची आहे. मी याआधी जरांगे यांच्या समोर माझी भूमिका मांडलेली आणि मी काही ही बोललो तरी सरकार काय करणार? माझ्याकडे आत्ता सत्ता नाही, काहीच नाही, त्यामुळे माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही. परंतु ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं, तेच आज सत्तेत आहेत, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा.. काही जण तर पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होतात, परंतु तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही हे त्यांना विचारा असा उलट सवाल (Uddhav Thackeray On Maratha Aarakshan) उद्धव ठाकरेंनी केला. ज्यांनी आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ते लोक आता गावी पळालेत. का फक्त दर्शन घेतात. गेले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत मग ते जरांगेंना न्याय का देऊ शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.