नागपूर | महाराष्ट्राला लागलेला शनि दूर झाला पाहिजे. जेणेकरून राज्यावरील पि केवळ दिखावा दाखविण्यासाठी तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणावी. दिल्लीत आम्हांला अत्यंत आदरपूर्वक वातावरण दिसले. परंतु महाराष्ट्रातच संकटमोचन हनुमान चालिसेला एवढा विरोध का, त्यामुळे हा शनि दूर होण्यासाठी हनुमान चालिसा दररोज पठण करेन. राजकीय ताकदीचा दुरूपयोग महाराष्ट्रात होत असल्याचा आरोप खा. नवनीत राणा यांनी केला आहे.
नागपूर येथील विमानतळावर आगमन होताच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. यावेळी समर्थकांनी मोठी घोषणाबाजी करत वाजत- गाजत राणा दाम्पत्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेथून ते काही वेळात हनुमान मंदरात जावून हनुमान चालिसेचे पठण करणार आहेत. आज हनुमान चालिसावरून चांगेलच रणकंदन सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून नागपूरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर याच मंदिरात आता राणा दाम्पत्यांनीही हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळे नागपूरातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात तापलेले पहायला मिळाले.
खा. नवनीत राणा म्हणाले, आम्ही 35 ते 36 दिवसानंतर आम्ही महाराष्ट्रात आलो आहे. संकटमोचन हनुमानचा महाराष्ट्रात इतका विरोध का? उध्दव ठाकरे यांना दुसरे काही काम राहिले नाही. अमरावतीत आम्ही मोठी आरती घेणार आहोत. आमची एकच भूमिका राहणार आहे. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत. लोडशेडींग दूर व्हावे, तसेच महाराष्ट्राला लागलेला शनि दूर व्हावा.