अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून ओढत शेतात नेले, अन्…
औरंगाबाद – सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करीत असल्याचे पाहताच एका 21 वर्षीय नराधमाने तिचा तोंडदाबून फरपटत शेतातनेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा गावात घडली. शिल्लेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.अनिकेत उर्फ अन्या ज्ञानेश्वर चव्हाण वय-21 वर्ष (रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन पीडितेला अंघोळीसाठी बाथमरूममध्ये जाताना आरोपी अनिकेतने पाहिले होते. बाथरूम मध्ये जाताच आरोपीने पीडितेचे तोंड दाबून तिला फरपटत गायरान शेतीमध्ये घेऊन गेला.तेथील पाण्याच्या हौदा शेजारी तिला जीवे मारण्याची धमकीदेत पाशवी बलात्कार केला व पसार झाला.
भेदरलेल्या पीडितेने घडलेली घटना तिच्या घरच्यांना सांगितली. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. या घाटनेमुळे पुन्हा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.