हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकत आहात, ते टेकू शकला असता? बसू शकत आहात, ते बसू शकला असतात? एवढं जरी कळलं, तरी अभिजातच काय, सर्वोत्तम सर्वोच्च दर्जा देण्यासाठी एवढी एकच गोष्ट पुरे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली केली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझी मातृभूमी, माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा व गौरवाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या, मग पाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनातील तळमळ बोलून दाखवली
दरम्यान, वर्षामागून वर्ष जात आहेत. अजून मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळत नाहीये. गेल्या वर्षी मी उद्वेगाने म्हटलं, जे दिल्लीत दर्जा देणारे किंवा नाकारणारे बसले आहेत, त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायला हवी किंवा अगदी खडसावून सांगितलं पाहिजे, ही आमची मातृभाषा आहे व आम्हाला तिचा अभिमान आहेच, असं मुख्यमंत्री म्हणाले. इंग्रजी आली पाहिजे, आम्हाला दुसऱ्या भाषेचा दुस्वास करायचा नाही पण त्यामुळे माझी भाषा कमकुवत नाही होता कामा नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’