हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 ला महाविकास आघाडीची बैठक सुरु होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं होत, मात्र काँग्रेस राष्टवादीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असं सांगितल्याचा खुलासा त्यांनी केला. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
2019 विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या चर्चेत शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि अजून एकदोन नावे सुचवली होती. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जे आमदार मंत्री होणार होते त्यातील अनेकजण हे सिनियर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी गळ घालण्यात आली. बाकी काही मला माहित नाही, असे भुजबळ यांनी सांगितली.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे याना दिल असलं तरी खरी शिवसेना कोणाची हे राज्यातील जनताच ठरवेल, मात्र त्यासाठी निवडणुका आवश्यक आहेत असे छगन भुजबळ यांनी म्हंटल. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे चिन्ह आणि नाव खूप कमी वेळेत लोकांपर्यन्त पोचत, आणि शेवटी संघटनेचा प्रमुख कोण आहे, हेच लोक लक्षात घेत असतात असेही त्यांनी म्हंटल.