पुन्हा वाघाची डरकाळी : हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टिझर आला

Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी, 8 जून रोजी पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेपूर्वी भाजप व मनसेकडू उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला सलुनयाने सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तिसरा टीझर जारी केला आहे. त्यातून उद्धव ठाकरे सभेत औरंगाबाद नामांतरसह काय बोलणार याची झलकही पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेचा तिसरा टीझर आला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे एका सभेला संबोधित करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये सुरुवातीला ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्याप्रमाणे बोलतात. त्याप्रमाणे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… हे आहेच ना संभाजीनगर. हिंदू आहोत आम्ही. हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं, असे उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत.

टीझरच्या शेवटी देव… देश आणि धर्म हेच शिवसेनेचे मर्म… ही कॅच लाईन टाकण्यात आली आहे. तसेच येत्या 8 जून रोजी सायंकाळी 6 वाजता औरंगाबादच्या मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार असल्याचे या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये सभेची विराट गर्दी दाखवण्यात आली आहे.