शासन आपल्या दारी पण त्यांना कोणी दारात उभ करत नाही.., उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, “शासन आपल्या दारी पण कोणी त्यांना दारात उभ करत नाही” अशा शब्दात राज्य सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर, पीक विमा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून देखील सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळे आता त्यांच्या या टीकेला शिंदे गटाकडून काय उत्तर मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. यासाेबतच पीक विमा घोटाळ्याचा विषय तर वेगळाच आहे. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं दोन लाखांच कर्ज माफ केलं होतं. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारली होती. त्यामुळे नाटकं बंद करा आणि कर्जमुक्ती करा. उगाच घोषणा करून भुलभुलैय्या करू नका” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सरकारला केलं.

त्याचबरोबर, धारावीकरांना 500 चौरस फुटाचे घर द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. “धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांचे त्यांच्या उद्योगासाठी तिथेच स्थानांतर होणे गरजेच आहे 400 ते 500 फुटांची जागा मिळायला हवी. 80 ते 90 हजार झोपड्या अद्याप पात्र अपात्रतेच्या सीमेवर आहे. मला अडाणी यांना विचारायचं आहे की तुम्ही काय करणार आहात. सरकार उद्योगपतीला मदत करत आहेत. पिढ्यान् पिढ्या धारावीवासीय राहत आहेत त्या ठिकाणीं धारावी वासियांना राहायला मिळायला हवं” असे उद्धव ठाकरेंनी म्हणले आहे.

दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला एक मोठ्या आवाहन केले आहे. “पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या आता दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या” असे आवाहन उद्धव ठाकरेंकडून भाजपला करण्यात आले आहे.