उद्धव ठाकरेंच्या विद्यमान खासदाराला भाजपकडून लोकसभेचे तिकीट; नेमकं घडतंय काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये भाजपकडून अनेक दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं. मात्र सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा भाजपने सध्याच्या ठाकरे गटाच्या खासदारालाच उमेदवारी दिली. होय, शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या दादरा नगर हवेलीच्या (Dadra & Nagar Haveli) खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना भाजपने उमेदवारी जाहीर करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.

कलाबेन डेलकर यांनी त्यांचे पती आणि खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर 2021 मध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकली होती. सहानुभूतीच्या लाटेत त्यांनी भाजप उमेदवार महेश गावित यांचा सुमारे ५१ हजार मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. मात्र त्याच कलाबेन डेलकर यांनी आता ठाकरेंची साथ सोडून भाजपचा रस्ता धरला आहे. कलाबेन डेलकर याना लोकसभेचे तिकीट देऊन भाजपने एकप्रकारे ठाकरेंना शह देण्याचं प्रयत्न केला आहे.

मोदींची घेतली होती भेट –

दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये खासदार कलाबेन डेलकर यांचा पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो समोर आला होता. कलाबेन डेलकर यांनी कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी मात्र हि फक्त सदिच्छ भेट असल्याचे डेलकर यांनी सांगितलं होते. मात्र तेव्हापासूनच कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणारा का? याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. आता भाजपने आपल्या उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कोणती रणनीती आखणार आणि भाजपला नेमका कसा शह देणार हे पाहायला हवं.