हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर काल केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली. यावेळी आयोगाकडून निर्णय राखून ठेवत 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या युक्तिवादावेळी उद्धव ठाकरेंचे ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख घटनाबाह्य असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आता ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पक्षप्रमुखपद धोक्यात आले आहे. दरम्यान 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची 5 वर्षे पूर्ण होत आहेत. याच तारखेला त्यांची संघटनात्मक प्रमुख पदाची मुदत संपत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणाची कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आता आयोग व न्यायालय नक्की कुणाच्या बाजूने निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 23 जानेवारी 2018 मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची निवड झाली होती. ही निवड 5 वर्षांसाठी करण्यात येते. ही मुदत 23 जानेवारी 2023 ला संपत आहे.
निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ वरील सुनावणी पुढे ढकलली; आता पाहावी लागणार ‘या’ दिवसाची वाट
काल निवडणूक आयोगासोमार पार पडलेल्या सुनावणीवेळी संघटनात्मक प्रमुख निवणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली. मात्र, निवडणूक आयोगाकडून याबाबत निर्णय देण्यात आला नाही. मात्र, एका आठवड्यानंतर चिन्हांबाबत सुनावणी घेण्याचे आयोगाच्यावतीने सांगण्यात आले.