उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा – खासदार संजय राऊत

0
67
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. तसेच शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या टीकेला याच टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

“उदयनराजेंनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावं लागत नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. महाराजांचं नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचं काम पुढे नेलं,” असंही यावेळी ते म्हणाले.

उदयनराजेंनी केलेल्या शरद पवार यांच्यावरील टीकेचा संजय राऊत यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. “शरद पवार जाणते राजे आहेतच. त्यांना जनतेने ही उपाधी दिली आहे. शिवसेना प्रमुख स्वत: म्हणाले नाहीत की आपण हिंदूह्रदयसम्राट आहोत. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, लोकांनी त्यांना राजा मानलं. महाराष्ट्रात देशासाठी, समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा माणूस जनतेचा राजा आहे. आम्हीही शरद पवारांना तो मान देतो,” असं उत्तर यावेळी त्यांनी दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here