नवी दिल्ली | अमित येवले
शैक्षणिक प्रवेशासंदर्भात यूजीसी तर्फे महत्त्वाचं नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यापुढे शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट जमा करण्याची गरज नसणार आहे. एका वेळी संपूर्ण कोर्सची फी घेता येणार नाही.
या अध्यादेशानुसार एका वर्षाची किंवा एका सेमिस्टरचीच फी घेता येणार आहे. तसेच प्रवेश रद्द केल्यास फी परत करण्यात येणार आहे. हे नवे नियम सर्व महाविद्यालयांवर बंधनकारक राहणार असून नियमांचं उल्लंघन केलं तर सबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.