माढा : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यतील माढा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये पोहताना 15 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हातातली दोरी सुटल्यामुळे तो पाण्यात बुडाला आहे. मृत मुलगा हा माढा तालुक्यातील भिमानगर या ठिकाणी पोहण्यासाठी गेला होता. बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली आहे.
रोहन सुरेश पवार असे या मृत मुलाचे नाव आहे. तो भिमानगर या ठिकाणी वास्तव्याला होता. स्थानिक नागरिक व मच्छीमार यांनी मृत रोहनचा मृतदेह शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे तो दोरीच्या साहाय्याने कॅनॉलमध्ये पोहत होता.
नेमके काय घडले ?
उजनी धरणाच्या कॅनॉलमधून शेतीला पाणी सोडलं जातं. हे पाणी गरजेनूसार सोडलं जातं. घटनेच्या दिवशीसुद्धा माढा तालुक्यातील भिमानगर येथे कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आले होते. काल दुपारी मृत रोहन सुरेश पवार हा दुपारच्या सुमारास भिमानगर येथील कॅनॉलमध्ये पोहोण्यास गेला होता. ज्यावेळी तो पाण्यात उतरला त्यावेळी त्याच्या हातात दोरी होती. मात्र त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने मृत राहुलच्या हातातून दोरी सुटली आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.