सांगली प्रतिनिधी । सुसंस्कृत व्हायचे असेल तर चांगल्या वाचनाची आवड आणि सवय हवी, मन सशक्त बनविण्यासाठी अनेक गोष्टी वाचल्या पाहिजेत असे आवाहन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केले. ग्रामपंचायत आणि रोटरी समाज दल हरिपूर संचालित मोफत वाचनालय हरीपूरच्या शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी निकम बोलत होते. निकम यांनी यावेळी संगमेश्वराचेही दर्शन घेतले.
पुढे बोलताना निकम म्हणाले, नव्या जमान्यात नेट व मोबाईलमुळे सर्वकाही मिळते पण, त्यामुळे मानसिकता चांगली बनते का वादाचा विषय आहे. झटपट मार्गाचा अवलंब करणारे आयुष्यात यशस्वी होत नाहीत. हुशारी निर्माण करावी लागते. वीरश्री अंगात निर्माण होण्यासाठी ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत.
वाचनाचं महत्त्व याविषयावर निकम यांनी प्रामुख्याने उपस्थितांशी संवाद साधला. वाचनातून येणारी प्रगल्भता ही आयुष्याला दिशादर्शक असून अहंपणा असलेली व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही ही टिप्पणीही निकम यांनी केली. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.