हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझलच्या वाढत्या (Ultraviolette F77) किमतीमुळे अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे. ग्राहकांची वाढती पसंती पाहता अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगळुरू स्थित Ultraviolette Automotive Pvt Ltd ने हाई-परफॉर्मेंस इलेक्ट्रिक बाईक अल्ट्राव्हायोलेट F77 ची डिलिव्हरी सुरु केली आहे. कंपनी सध्या उत्पादन प्लांटमधून अल्ट्राव्हायोलेटची थेट डिलिव्हरी करत आहे. यासोबतच कंपनी देशभरात आपले डीलरशिप नेटवर्क तयार करत आहे.
307 किलोमीटर रेंज –
अल्ट्राव्हायोलेट F77 मध्ये 10.3kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. यामध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 40.5bhp पॉवर आणि 100 Nm टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक बाईकला ग्लाइड, कॉम्बॅट आणि बॅलिस्टिक असे तीन रायडिंग मोड मिळतात. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही बाईक तब्बल 307 किलोमीटर रेंज देते. या बाईकचा टॉप स्पीड 152 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. आणि अवघ्या ३ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ही इलेक्ट्रिक बाईक 60 किलोमीटर प्रतितास एवढा वेग पकडते.
किंमत किती – Ultraviolette F77
गाडीच्या किमतींबाबत सांगायच झाल्यास, Ultraviolette F77 ची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत 3.80 लाख रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला या गाडीच्या बुकिंगसाठी 10,000 रुपये द्यावे लागतील. ही बाईक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.ultraviolette.com/) बुक केली जाऊ शकते.
हे पण वाचा :
फक्त 2500 रुपयांत बुक करा ही Electric Bike; 156 किलोमीटर रेंज
Electric Bike : 135 किमी रेंज असलेली दमदार इलेक्ट्रिक बाइक लॉन्च; किंमत किती?
HOP OXO Electric Bike : या Electric Bike ची डिलिव्हरी सुरु; 150 किमी मायलेज
Ola, Ather ला तगडी टक्कर देणार ही Electric Scooter; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये