कराड | उंब्रजमध्ये शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस त्रास देणाऱ्या एका रोडरोमिओला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या रोडरोमिओची तक्रार मिळताच दोन तासात उंब्रज पोलिसांनी उचलबांगडी केली. प्रणीत प्रमोद माने ( रा. चिखली, ता. कराड) याला उंब्रज पोलिसांनी तक्रार मिळताच दोन तासात अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची सातारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
या आरोपीला उंब्रज पोलीस ठाण्याच्या टीमचे मसूर दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस अंमलदार प्रशांत पवार यांनी 2 तासात ताब्यात घेऊन अटक केली. संशयिताला न्यायालया समोर हजर केले असता, न्यायालयाने त्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आरोपीला सातारा जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे.
सदरची कारवाई सातारा जिल्हा अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाटे, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. रणजित पोटील व उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनी अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांनी केली.