सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कराड- सातारा मार्गावर असलेल्या उंब्रज येथे एका हाॅटेस समोर दोन वर्षाचा मुलगा चुकलेला होता. या चिमुरड्याला आपले नांव सांगता येत नसल्याने एका इसमाने मुलास उंब्रज पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी तात्काळ मुलाची माहिती सोशल मिडियावर व्हायरल करत शोधमोहिम सुरू केली. अखेर मूळचा उत्तर प्रदेशातील असलेल्या या चिमुरडा अन् त्यांच्या आईची भेट उंब्रज पोलिसांनी घडवून आणली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज येथील हॉटेल विकास समोर प्रियांश पासवान हा दोन वर्षांचा लहान मुलगा भटकला होता. एक इसमास चिमुरडा आढळल्याने त्यानी पोलिस स्टेशनला संपर्क केला. उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलास आणण्यात आले. मात्र त्यास नाव व पत्ता सांगता येत नव्हता. मुलगा सतत रडत होता. त्यास उंब्रज पोलीस मायेने माहिती विचारून बिस्किटे व खाऊ दिला.
उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या सुचनेनुसार उंब्रज पोलिस टिमने शोधमोहिम राबविली. सोशल मिडीयावरून माहिती पाठवणे व उंब्रज परिसरात शोध घेणे चालू केले असता. तिच्या प्रिकी चंचल पासवान या मुलाच्या आईचा शोध लागला. पोलिसांनी खात्री करुन आईच्या ताब्यात मुलगा प्रियांश पासवानला दिला. सदरची शोधमोहिमेत ASI साळुंखे व कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता पवार, कल्याणी काळभोर, प्रतिक्षा बनसोडे, गौरी यादव यांनी सहभाग घेतला होता. प्रिकी चंचल पासवान व प्रियांश चंचल पासवान हे मूळचे रा. उत्तरप्रदेश येथील राहणारे असून सध्या- तासवडे MIDC कामानिमित्त आहेत.