व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नाशिक हादरलं ! म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या (Murder)  करण्यात आली आहे. या तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या (Murder) करण्यात आली आहे. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात हे हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव राजेंद्र गांगुर्डे असं आहे. राजेंद्र गांगुर्डे हा 24 वर्षांचा होता. पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून राजेंद्र गांगुर्डे याची हत्या (Murder) करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. राजेंद्रच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये विहिरीत चार मृतदेह आढळून आले होते. नाशिक जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत विहिरीत चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. नाशिकच्या सटाणा आणि लासलगाव परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये विहिरीत 4 मृतदेह आढळले आहेत. एका घटनेत दिर-भावजयीचा, दुसऱ्या आणि तिसऱ्या घटनेत दोन तरुणांचा मृतदेह आढळून आला आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब