नवी दिल्ली । नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. EPF मेंबर आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करून EPF, EPS नावनोंदणी डिजिटल पद्धतीने बदलू शकतात. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सर्व EPFO मेंबर्सना भविष्य निर्वाह निधी (PF) एनरोलमेंटची सुविधा देत आहे. जेथे तुम्ही ऑनलाइन मोडद्वारे EPF, EPS एनरोलमेंट सहजपणे सबमिट करू शकता.
त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची घोषणा करताना, EPFO ने सांगितले की, EPF मेंबर सध्याचे EPF/EPS एनरोलमेंट बदलण्यासाठी नवीन एनरोलमेंट दाखल करू शकतात.
EPFO मेंबर साठी: आधार लिंक केलेला UAN नंबर, आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आणि पत्ता आणि फोटोसह अपडेट केलेले EPFO मेंबर प्रोफाइल.
नॉमिनी व्यक्तीसाठी: स्कॅन केलेला फोटो, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि ऍड्रेस प्रूफसह अलीकडील पत्ता.
त्यासाठीची प्रोसेस जाणून घ्या
1- ऑनलाइन पीएफ नॉमिनेशन करण्यासाठी, पहिले तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल – epfindia.gov.in.
2- यानंतर ‘Service’ वर जा आणि ‘For Employees’ टॅब वर क्लिक करा.
3- त्यानंतर Services मध्ये ‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ तपासा.
4- तुमचा UAN आणि Password वापरून लॉगिन करा.
5- ‘Manage’ टॅब अंतर्गत ‘E-Nomination’ निवडा.
6- तुमची फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी ‘Yes’ वर क्लिक करा.
7- ‘Add Family Details’ वर क्लिक करा.
8- रकमेचा एकूण भाग घोषित करण्यासाठी ‘Nomination Details’ वर क्लिक करा.
9- घोषणा केल्यानंतर, ‘Save EPF Nomination’ वर क्लिक करा.
10- OTP मिळवण्यासाठी ‘ई-साइन’ वर क्लिक करा.
11- तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
12- OTP टाका.
13- यासह, तुमचे E-Nomination EPFO वर रजिस्टर झाले आहे.