Wednesday, October 5, 2022

Buy now

आधारशी आपले जन धन खाते लिंक करण्यासाठी काय करावे ते समजून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. 2014 मध्य आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत सरकार जनधन बँक खातेधारकांना अनेक सुविधा देते. जन धन खाते हे एक प्रकारे झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट आहे. तसेच यामध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील मिळते.

जन धन खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये 1 लाख रुपयांचे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरही मिळते. इतकेच नाही तर खातेधारकाला जन धन खात्यावर 30,000 रुपयांचे ऍक्सिडेंटल डेथ इन्शुरन्स कव्हर देखील मिळते. मात्र जर खातेदाराने आपले जन धन खाते आधारशी लिंक केले नाही तर त्याला या सुविधांचा फायदा घेता येणार नाही.

आपले जन धन खाते आधारशी अशा प्रकारे लिंक करा
जन धन खाते आधारशी लिंक करण्यासाठी तुमचे हे खाते असलेल्या बँकेत जा.
त्यासाठी तुम्हाला आधार कार्डची फोटो कॉपी आणि बँक पास बुकची कॉपी सोबत ठेवावी लागेल.
यासाठी बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. ज्यानंतर तुमचे जन धन खाते आधारशी लिंक केले जाईल.
सध्या अनेक बँका ग्राहकांना फक्त SMS द्वारे जन धन खाते आधारशी लिंक करण्याची परवानगी देतात.
यासाठी, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून मेसेजमध्ये UID<SPACE>आधार क्रमांक<SPACE>खाते क्रमांक लिहा आणि 567676 या क्रमांकावर पाठवा.
अशा प्रकारे तुमचे खाते आधारशी सहजपणे लिंक केले जाईल.
तुम्ही बँकेच्या ATM द्वारे देखील आधारशी लिंक देखील करू शकाल.