हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Underwater Museum । स्कुबा डायव्हिंग व पाणबुडीद्वारे पर्यटन, समुद्र तळात जहाजाची अनोखी सफर करण्याची इच्छा असणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय बांधले जाणार आहे. वेंगुर्ला किनाऱ्याजवळील निवती राॅकजवळ प्रवाळात पाण्याखाली संग्रहालय व जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे याचा शुभारंभ करण्यात आला आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या पाठिंब्याने ४६.९१ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट सागरी जैवविविधता संवर्धन, पर्यावरण पर्यटन आणि स्कूबा डायव्हिंग आणि पाणबुडी टूर सारख्या पाण्याखालील साहसी पर्यटनाला प्रोत्साहन (Underwater Museum) देणे हेच आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) द्वारे राबविला जात आहे.जानेवारी २०२४ पर्यंत भारतीय नौदलात सेवा देणारे निवृत्त जहाज आयएनएस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आले असून हे जहाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती जवळ समुद्रात पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मान्यतेने भारतीय नौदलाने निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे. या जहाजाचे वजन १,१२० टनआहे. तर लांबी ८३.९ मीटर असून रुंदी ९.७ मीटर आहे. ५.२ मीटर खोली आहे.
काय फायदे होणार? Underwater Museum
१) पाण्याखालील संग्रहालयाच्या (Underwater Museum) या प्रकल्पामुळे किनारी पर्यटनाला (Tourism) चालना मिळे आणि स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
२) पर्यावरण पर्यटन आणि सागरी वारशाचे केंद्र म्हणून भारताचा दर्जा वाढेल.
३) पर्यटक, विद्यार्थी आणि सागरी संशोधकांसाठी शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक हेतूंसाठी हा प्रकल्प काम करेल.
४) या प्रकल्पामुळे सागरी संवर्धन आणि शाश्वत पर्यटन पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळेल.




