पुणे प्रतिनिधी |बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी या वेळी जनता उभा राहण्यास धजावली नाही असे चित्र सध्या तरी मतदानानंतर दिसू लागले आहे. कारण इंदापूर तालुक्यात सुद्धा कधी नव्हे ते या वेळी कमळ लोकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना इंदापुरातून मताधिक्य मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.
हनुमंत डोळसांच्या अंत्यसंस्काराला मोहिते पाटील-शरद पवार येणार आमनेसामने
इंदापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. हा पराभव हर्षवर्धन पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. बारामतीकरांनीच आपला पराभव घडवून आणला याचे शल्य अद्यापही हर्षवर्धन पाटील यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी सुप्रिया सुळे यांना किती मनोभावे मदत केली यावर सर्वत्र प्रश्नचिन्ह उभा केले जात आहे. तर त्यांचे कार्यकर्तेच आपल्या नेत्याचा पराभव अद्याप विसरू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी देखील सुप्रिया सुळे यांना मनापासून मदत केलेली नाही.
आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत झालेली विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील भेट राजकीय जाणकारांना कोड्यात टाकणारी होती. तर या भेटीमुळे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रभावतील मतदार देखील शेवट पर्यत संभ्रमात होते कि नेमके कोणाला मतदान करायचे? त्याच प्रमाणे एक शक्यता अशीही वर्तवण्यात येते आहे कि , हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला गुप्तपणे मदत केली असावी कारण त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आता वेग आला आहे आणि अशा परिस्थितीत अधिकचे मतदान नेमके कोणाला झाले आहे हे गुप्त मतदान पद्धती एवढीच गुप्त असणारी बाब झाली आहे.
पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज
तर तिकडे खडकवासला मतदारसंघात भाजपला मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. त्या म्ताधीक्याची व्याप्ती एवढी असणार आहे कि हे मताधिक्य अंतिम मताधिक्यावर देखील परिणाम करणारे असू शकते असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात भाजपच्या विजयाची मदार दौंड आणि खडकवासला या मतदारसंघावरच राहणार आहे. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या सर्वेक्षणावरून हे देखील समोर आले आहे की भोर आणि व्हेल्यात सुप्रीया सुळे या अनपेक्षित पिछाडीवर जावू शकतात. अशा सर्व अंदाजामुळे २३ मेच्या निकालाची उत्कटताअधिकच वाढली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत
मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…
माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान
तुम्ही भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवा ; राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस
पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी
राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला
पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ