दुर्देवी ः वीज पडून दहा शेळ्या, एक बोकड जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या माण तालुक्यातील शिरताव आसरा शोधला नि होत्याचे नव्हतं झालं. वीज पडून दगडू नामदेव लुबाळ यांच्या दहा शेळ्या आणि एक बोकड वीज पडून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

शिरताव येथील लुबाळ कुटुंबातील सदस्य दहा शेळ्या व बोकड घेऊन शिवारात आले होते. दुपारी अचानक ढगाळ वातावरणामुळे त्यांनी तातडीने शेळ्या व बोकडाचा आसऱ्यासाठी एका झाडाच्या सावलीत उभ्या केल्या. इतक्यात वादळ वाऱ्यासह कडाक्याची वीज नेमकी झाडालगत कोसळून पडली, डोळ्यासमोर शेळ्या व बोकड गतप्राण झाले. या दुर्दैवी घटना घडल्या नंतर महसूल विभागाने तातडीने पंचनामा केला. सकाळी लवकर उठून शिवारात जाणारे शेळ्या व बोकडाचा विना रिकाम्या हाताने परत जाताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. शेजारीच माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे गाव आहे.

सुमारे एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेजारी असलेल्या झाडाखाली लुबाळ कुटूंबियांना आसरा घेतला होता. त्यांच्या डोळ्यादेखत घटना घडली अशी माहिती श्री. चंदनशिवे यांनी दिली. लुबाळ कुटूंबियांना तातडीने आर्थिक मदत करून त्यांना पुन्हा स्वाभिमानाने जगण्याची उमेद दयावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्रनाथ चंदनशिवे व भाजप ओबीसी विभाग युवा जिल्हाध्यक्ष करण सुनिल पोरे यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment