हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) सादर केला. मोदी सरकारकडून आजच्या अर्थसंकल्पात विविध मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी देशभरातील करदात्यांना सरकारने खुश केलं आहे. सीतारामन यांनी नवी कररचना जाहीर केली आहे. त्यानुसार 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे.
यापूर्वी 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. आता केंद्र सरकारने यामध्ये वाढ केली असून आता ही रक्कम 7 लाख रुपये केली आहे. त्यामुळे मोदी सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे करदाते त्यांच्या वाचणाऱ्या पैशातून गुंतवणुकीकडे वळतील आणि याचा थेट फायदा अर्थव्यवस्थेला होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अशी असेल नवी कररचना –
0 ते 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 0 टक्के कर
3 ते 6 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 5 टक्के कर
6 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 10 टक्के कर
10 ते 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 15 टक्के कर
12 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 20 टक्के कर
15 लाख रुपय़ांवरील उत्पन्नावर 30 टक्के कर आकारण्यात येणार आहे.