Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग?? पहा एका Click वर

Union Budget 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला. आगामी 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे मोदी सरकार नेमक्या कोणकोणत्या घोषणा करणार याकडे देशवासीयांचे लक्ष्य लागले होते. आणि सरकारनेही अनेक मोठमोठ्या केल्या आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही वस्तू महाग होणार आहेत. चला सविस्तरपणे जाणून घेऊया नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या महाग होतील….

स्वस्त होणाऱ्या वस्तू-

इलेक्ट्रिक कार, मोबाईल फोन, एलएडी टीव्ही, टीव्हीचे पार्ट, सायकल, लिथिअम आयन बॅटरी, परदेशातून आयात होणारी खेळणी, कॅमेरा, कॅमेरा लेन्स, कपडे बायोगॅसशी संबंधित वस्तू या वस्तू स्वस्त होणार आहेत.

महाग होणाऱ्या वस्तू-

तर दुसरीकडे सोने- चांदीच्या किमतीत वाढ होणार आहे, सिगारेट महागणार आहेत. सोन्या- चांदीची भांडी, एक्स-रे मशीन, प्लॅटिनम, विदेशी किचन चिमणी, एक्स-रे मशीन महाग होणार आहेत.

करदात्यांना केंद्र सरकारचा दिलासा –

देशातील करदात्यांना मोदी सरकारने खुशखबर दिली आहे. निर्मला सीतारामन यांनी नवी कररचना जाहीर केली आहे. त्यानुसार 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. यापूर्वी 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. आता केंद्र सरकारने यामध्ये वाढ केली असून आता ही रक्कम 7 लाख रुपये केली आहे. त्यामुळे मोदी सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे करदाते त्यांच्या वाचणाऱ्या पैशातून गुंतवणुकीकडे वळतील आणि याचा थेट फायदा अर्थव्यवस्थेला होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.