Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मागील १० वर्षात मोदी सरकारने देशातील जनतेसाठी केलेल्या कामाचे वाचन केलं. आमचं सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असून २०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ असं सीतारामन यांनी म्हंटल. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात विविध घोषणा करत देशवासियांना खुश केलं आहे. मोदी सरकारने आज घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे
निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणा – Union Budget 2024
पायाभूत सुविधांसाठी ११ लाख ११ हजार कोटींची तरतूद
४० हजार रेल्वे कोच वंदे भारत मध्ये बदलणार
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहान देऊन जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणणार
देशात इ बस सेवाही राबवणार (Union Budget 2024)
१ कोटी घराना सौरऊर्जा देण्याचा प्रयत्न
देशात १५ नवे एम्स हॉस्पिटल सुरु करणार
Interim Budget 2024-25 | Union Finance Minister Nirmala Sitharaman says, “Many growth and development-enabling reforms are needed in the state for realising the vision of Viksit Bharat. A provision of Rs 75,000 Crores as a 50-year interest-free loan is proposed this year to… pic.twitter.com/WzgHGbumvA
— ANI (@ANI) February 1, 2024
३ रेल्वे कॉरिडोर सुरु केले जाणार
राज्यांच्या विकासासाठी बिनव्याजी ७५ हजार कोटी रुपये देणार
पर्यटनाचा विकास करण्यासाठी राज्यांना साहाय्य करणार
युवा उद्योजकांसाठी १ लाख कोटींचा फंड
मच्छिमारांसाठी ५५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार
वार्षिक ७ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही
प्रत्येक महिन्याला 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे
नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल
पर्यटन केंद्राचा वेगाने विकास केला जाणार