Union Budget 2024 Live : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज लोकसभेत अंतरिम बजेट 2024 सादर करत आहेत. १० वर्षात देशात सकारात्मक विकास झाला आहे. सबका साथ सबका विकास हाच आमचा ध्यास राहिला आहे असं त्यांनी म्हंटल आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करत आलोय, सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहिलो आहोत. सर्व जातीधर्माना न्याय देत २०४७ मध्ये नक्कीच विकसित भारताच्या रूपात आपण समोर येऊ अशी अपेक्षा निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला व्यक्त केली.
#WATCH LIVE: FM Nirmala Sitharaman presents Interim budget 2024https://t.co/ZqcwXqLnLV
— ANI (@ANI) February 1, 2024
महिला वर शेतकऱ्यांवर भर- Union Budget 2024 Live
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश पुढे जात आहे. गरीब, महिला आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत आहे. सरकारने २५ कोटी जनतेसाठी विविध योजना राबवल्या आहेत. सरकारच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे. देशातील ८० टक्के लोकांना आम्ही मोडत रेशन देत आहोत. स्किल इंडिया मिशनमध्ये १.४ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. 3000 नवीन आयटीआय तयार करण्यात आले अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी सांगितली
निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या, आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे. ‘प्रत्येक घराला पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्यासाठी सरकारकडून काम करण्यात आले आहे.आमच्या सरकारच्या वतीने पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांचे 43 कोटी कर्ज मंजूर करण्यात आले. 30 कोटी मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना कर्ज देण्यात आले. तर 11.8 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली. पीएम आवास योजनेतून सरकारने आत्तापर्यंत ३ कोटी घरे बांधली. आता पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील अशी ग्वाहीही निर्मला सीतारामन यांनी दिली.
वृत्त सविस्तर अपडेट होत आहे….