भारत-चीन तणाव: राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं- अमित शहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या दाव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर गृहमंत्री अमित शहांनी राहुल गांधी यांनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं आणि राष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं उभं राहायला हवं असा सल्ला दिला आहे.

मोदींच्या चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केली नसल्याच्या विधानावर केंद्र आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी यात राजकारण करू नका, असं आवाहन केलं होतं. तो व्हिडीओ ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे. “एका शूर जवानांच्या पित्यानं स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. आज संपूर्ण देश एकवटला आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं आणि राष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं उभं राहायला हवं,” असं ट्विट करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधानांनी दिलेल्यानिवेदनातं चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केली नसल्याचा म्हटलं आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दोन सवाल केले होते. “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, असं म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असा जाब राहुल यांनी सरकारला विचारला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”