नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणामधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या बऱ्याच नेत्यांना कोरोनाची लागण आहे. गृहमंत्री अमित शहांशिवाय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा या भाजपच्या बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्वांवर सध्या उपचार सुरु आहे. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांचा तिसरा कोरोना चाचणी अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त मिळत आहे.
दरम्यान, मागील २४ तासांमध्ये देशात ५२ हजार०५० नव्या रुग्णांची नोंद झाली असून ८०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत कोरोनामुळे ३८ हजार ९३८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसाला ५० हजारांपेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”