मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश केला जाणार आहे. यासाठी अगोदर असलेल्या काही नेत्यांना आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागणार आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या विस्ताराच्या मंत्रिमंडळात देशासह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी नव्या मंत्रिमंडळातील सुमारे २२ मंत्री शपथ घेतील.

मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. सध्या पाहिल्यास मोदिंच्या मंत्रिमंडळात फक्त 53 मंत्री आहेत. तर घटनेनुसार मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त 79 असणे आवश्यक आहे. तर सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 26 मंत्रिपदं रिक्त आहेत. ती भरून काढण्यासाठी आज सायंकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.

Leave a Comment