हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई येथून सुरु केलेलया जन आशिर्वाद यात्रेत महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनंतर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मंत्री राणेंना अटक करण्यात आल्याने जन आशीर्वाद यात्रा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. ती पुन्हा मंत्री राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारपासून सुरु करण्यात येणार आहे. याबाबत आज सायंकाळी निर्णय घेतला जाणार आहे.
भाजपकडून मोठ्या उत्साहात जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आलेली होती. या जन आशिर्वाद यात्रेतून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून टीकास्त्र डागले गेले. महाराष्ट्रातील मुंबईतून नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेतून सर्वाधिक टीका हि शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झाली झाली. दरम्यान, राणेंनी टीका केल्यानंतर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यामुळे भाजपची जन आशीर्वाद यात्रा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती.
दरम्यान, नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आल्याने भाजपकडून स्थगित करण्यात आलेली जन आशीर्वाद यात्रा आता पुन्हा शुक्रवारपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या जन आशिर्वाद यात्रेतून राणे पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधणार का? हे पाहावे लागणार आहे.