सांगली प्रतिनिधी । शासकीय स्कीम मंजूर करून देतो अशी आमिष दाखवून माजी सैनिक यांच्या पत्नीसह चौघा महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी राणी आदनामे, लता सूर्यवंशी, आणि राणीचा पती ह्या तिघांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार संबंधित महिलांनी दिली आहे. सुलोचना सोनवणे या अण्णा कासार झोपडपट्टी समोर खाडिलकर हॉस्पिटल शेजारी राहतात. सुलोचना यांचे पती मिलेट्री मध्ये होते. त्यांना छातीत दुखत असल्याने ते रजा घेऊन घरी परत आले होते. त्यांचे ऑपरेशन २०१५ साली करण्यात आले. त्यांच्या ऑपरेशनला ८ ते १० लाख रुपये खर्च झाला होता. तो झालेला सर्व खर्च शासनाकडून तुम्हाला परत मिळवून देतो असे सांगून राणी आदमाने हिने सुलोचना सोनवणे याच्या कडून वारंवार मागणी करून दोन लाख रुपये घेतले होते.
सोनवणे ह्यांनी इतकी रक्कम बचत गटातून आणि गळ्यातील मंगळसूत्र बँकेत गहाण ठेवून रक्कम जमवली होती. शिवाय, आपण घरकाम करता तर मी तुम्हाला पेन्शन चालू करितो असे सांगून ६० हजार रुपये राणी आदमाने या महिलेने घेतले होते. पैशे कधी मिळणार याची सोनवणे यांनी राणीकडे विचारणा केली असता, तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल असं राणी आदमाने गेली पाच वर्षे सांगत अली आहे. याच पद्धतीने रेखा शंकर शिंदे आणि विमल राजू कदम याची आर्थिक फसवणूक राणी आदमाने, तिचे पती आणि आई लता गंगाधर सूर्यवंशी या तिघांनी संगनमताने केली असल्याचा लेखी तक्रार अर्ज पोलीस अधिक्षकांकडे आला आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.