Thursday, October 6, 2022

Buy now

विद्यापीठात कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

विद्यापीठात सोमवारी अधिसभेची बैठक होती. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर तिन्ही महापुरुषांच्या नावाचा जयघोष झाला. त्यानंतर निषेधाच्या घोषणा झाल्या. त्यानंतर डॉ. संभाजी भोसले आणि अॅड. विजय सुबुकडे यांनी निषेधाचा ठराव मांडला. सभागृहात अर्धातास गोंधळ झाला.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाट या दोघांनी ठरावात भाग घेतला नाही आणि सभागृहाने हा ठराव बहुमताने मंजूर केला. कुलगुरूंनी आढेवेढे घेत स्पष्टीकरण दिल्याचे सांगितले. तरीही अधिसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने निषेधाचा ठराव घेण्यात आला.