फक्त 2 रुपयात घेऊ शकता अनलिमिटेड जेवण आणि गेमिंगची मजा; जाणून घ्या ठिकाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. अगदी साध्या साध्या गोष्टी विका घ्यायचे, म्हटलं तरी त्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. परंतु जर तुम्हाला सांगितले की, तुम्ही दोन रुपयांमध्ये हवे तितके अन्न खाऊ शकतात.तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. एवढेच नाही, तरी यामध्ये तुम्ही अनेक गेम खेळण्याचा आनंद देखील घेऊ शकता. असे एक ठिकाण आहे तिथे केवळ दोन रुपयांमध्ये हवे तितके जेवण मिळेल, तसेच तुम्हाला ड्रिंक्स आणि गेम खेळण्याचा आनंद देखील मिळणार आहे. आता हे ठिकाण नक्की कुठे आहे हे आपण जाणून घेऊया.

नुकतेच दिल्ली विमानतळावर एक नवीन रूपे लाउंज उघडले आहे. याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. जर चुकून तुमची फ्लाईट उशीरा झाली आणि तुम्ही विमानतळावर असाल, तर या वेळात तुम्ही या दिल्ली विमानतळाच्या लाउंजमध्ये जाऊन बसू शकता. परंतु या लाऊंजमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे रुपये कार्ड असणे गरजेचे आहे. तुम्हाला केवळ दोन रुपयांमध्ये हा अनुभव घेता येणार आहे.

दिल्ली विमानतळ T3 मध्ये रुपे लाउंज

तुम्ही दिल्ली विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनल 3 (T3 RuPay लाउंज) च्या गेट क्रमांक 41 मधून प्रवेश करू शकता. रुपे क्रेडिट कार्डद्वारे प्रति व्यक्ती 2 रुपये दराने प्रवेश करता येईल. प्रवेशासाठी तुम्हाला RuPay क्रेडिट कार्ड स्कॅन करावे लागेल. प्रवेश केल्यावर तुम्हाला दिसेल की लाउंज चार प्रकारे विभागलेला आहे. एक लाउंजिंग क्षेत्र, एक रेस्टॉरंट क्षेत्र, एक बार आणि एक गेमिंग रूम आहे.

रात्री उशिरापर्यंत ओपन

RuPay लाउंज नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्री उशिरा जेवण देते. हे विश्रामगृह दुपारी साडेचार वाजेपर्यंत खुले असते. तुम्ही कधीही दिल्ली विमानतळ टर्मिनल 3 ला भेट दिल्यास, RuPay लाउंजमध्ये तुमचे 2 रुपये खर्च करा आणि अमर्यादित अन्न, पेये आणि खेळांचा आनंद घेऊ शकता.