गुड न्यूज! उद्यापासून सिनेमाची थिएटर्स होणार सुरु, पण..

मुंबई । गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील सिनेमाची थिएटर्स अखेर उद्यापासून उघडणार आहेत. राज्य सरकारने अनलॉकच्या नव्या नियमावलीत थिएटर्स उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे थिएटर्स मालक आणि बॉलिवूडकरांना दिलासा मिळाला आहे (Unlock 6 Guidelines Theaters Will Start From 5th November).

उद्यापासून म्हणजेच 5 नोव्हेंबरपासून राज्यातील थिएटर्स उघण्यात येतील. मात्र, सध्या फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारानं घेतला आहे. अनलॉक-5च्या नियमावलीनुसार सरकारने राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं आधारावर दक्षता घेत सिनेमा थिएटर्स सुद्धा 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे.

या परवानगीने थिएटर्स मालक आणि बॉलिवूडकरांची दिवाळी गोड होणार आहे. याशिवाय कोरोनामुळं थिएटर्स बंद असल्याने बरेच बिग बजेट सिनेमांचे प्रदर्शन रखडले आहे. सरकारच्या परवानगी नंतर आता या सिनेमांच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, कोरोना काळात प्रेक्षकांची पावलं थिएटर्सकडे वळावी यासाठी थिएटर्स मालक आस लावून बसले आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

You might also like