१ सप्टेंबरपासून ‘अनलॉक ४’ला सुरूवात; ‘या’ गोष्टी होऊ शकतात पुन्हा सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना महामारीचा धोका संपूर्णरित्या टळला नसला तरी काळजी बाळगत कामं सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यापर्यंत (Unlock 4) भारत पोहचला आहे. अनलॉक ४ साठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून येत्या एक दोन दिवसांत गाईडलाईन्स (Unlock 4 guidelines) जारी करण्यात येतील. काही गोष्टी सोडून बाकीच्या इतर सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. राज्य आपापल्या गरजेनुसार आणि संक्रमणानुसार, गाईडलाईन्समध्ये बदल करू शकतील.

मुंबई लोकल
मुंबईमध्ये लोकल रेल्वे सेवा सुरु होण्याचे संकेत रेल्वे प्रशासनानाने दिले आहेत. राज्य सरकारला लोकल सेवा सुरु करण्यास अनुकूलता वाटतं असेल तर रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

दिल्ली मेट्रो
केंद्र सरकारकडून राजधानी दिल्लीत मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. २२ मार्चपासून मेट्रो सेवा ठप्प आहे. येत्या १ सप्टेंबरपासून दिल्ली-एनसीआर मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो सुरू झाली तर कॉन्टॅक्टलेस तिकीटिंग सिस्टम लागू केली जाण्याची शक्यता आहे तसंच टोकन्सही जारी केले जातील

रेस्टॉरन्टमध्ये दारु विक्री
दारुची दुकानांना आणि बारला ‘टेक अवे’ पद्धतीनं दारु विक्रीची परवानगी मिळू शकते. कर्नाटकमध्येही राज्य सरकारचा रेस्टॉरन्टमध्ये दारुविक्रीला परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. पुढच्या महिन्यात पब आणि क्बलही उघडले जाऊ शकतात.

देशांतर्गत विमान सेवा
१ सप्टेंबरपासून दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई आणि अहमदाबाद या सहा शहरांतून उड्डाण सेवा आठवड्यात तीन वेळा सुरू होऊ शकते. कोलकतामध्ये देशांतर्गत विमानांना उतरण्यासाठी परवानगी मिळू शकते. १ सप्टेंबरपासून दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई आणि अहमदाबाद इथून अनेक विमानं कोलकाता विमानतळावर उतरू शकतील, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. मात्र, राज्यात विकेन्डसला लॉकडाऊन सुरूच राहणार आहे.

सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स मात्र अद्याप उघडले जाणार नाहीत. सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांमुळे केवळ २५-३० टक्के सीट बुक होऊ शकतील. त्यामुळे तोटा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात मात्र सिनेगृह उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment