धुळे : तलाठी संघटनेच्या वतीने बेमुदत लेखणी बंद आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी । पांझरा नदी किनारील वार गावात वाळु उपसा करणाऱ्यांवर ग्रामिण तहसिलदार आणि त्यांच्या सह गेलेल्या पथकावर गावगुंडांनी भ्याड हल्ला केला . तसेच त्यांना मारहाण केली . त्याचे निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघ वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकञ येत जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. या भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व अटक होत नाही , तो पर्यत काळी फिती लावून लेखणी बंदचा पविञा जिल्ह्यातील तलाठी संघटनेने घेतला आहे .

जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष एन. वाय. कुलकर्णी, वाय आर पाटील, एस. बी. मोहिते, सी. यु. पाटील, आर एल सोनार, पी एस वाघ, आर पी कुमावत, एस सी नेमाणे व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment