राज्यात थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली मोठी माहिती

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यामध्ये हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु राज्यातील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोणत्याही भागात पाऊस पडणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच, राज्यात पुढील पाच दिवस कोरडे वातावरण राहील आणि काही काही भागात थंडीचे प्रमाण वाढेल, अशी माहिती हवामान खात्याकडून (Weather Department) देण्यात आली आहे.

पुढील 24 तासात थंडी वाढणार मुंबई हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढच्या 48 तासात थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या थंडीचे प्रमाण जास्त असेल असे देखील सांगितले आहे. सध्याच्या घडीला उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. यात मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा अशा काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. मधल्या काळात श्रीनगरमधील तापमान उणे ४.८ अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. तर दिल्लीत पारा ४ अंश वरती आला होता. यातच आता पुढील 24 तासात राज्यात थंडी वाढेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

थंडीची स्थिती उत्तर भारताच्या बाजूला पाहिला गेलो तर, येथे थंडीचा कडाका कमी अधिक होत असताना दिसत आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश अशा भागात किमान तापमान 3 ते 7 अंश दरम्यान आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये अंशतः ढगाळ वातावरण होत असल्याकारणाने किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यात आज गारठा कायमवर राहण्याची शक्यता आहे. परंतु या काळात राज्यात पाऊस पडणार नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिले आहे.