अयोध्या । मागील बुधवारी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर योगी आदित्यनाथ यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी त्यांनी विशेष संवाद साधला. राम मंदिरासोबतच अन्य मुद्द्यांवरही मोकळेपणानं चर्चा केली. यावेळी राम मंदिराप्रमाणे मशिदीच्या कार्यक्रमात सुद्धा सामील होणार का? असा सवाल योगी आदित्यनाथ यांना विचारला गेला. यांनतर मला मशिदीच्या कार्यक्रमासाठी कोणी बोलावणार नाही याशिवाय मी जाणार नसल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सर्वधर्मियांना निमंत्रण देण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या नात्याने योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमाची तयारी आपल्या देखरेखीखाली केली होती. याशिवाय या भूमिपूजन सोहळ्यात ते सहभागी झाले. याच संदर्भात आजतक या वृत्तवाहिनीवर त्यांना सवाल करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी आपण मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार नसल्याचं म्हटलं. “माझं जे काही काम आहे ते मी करणार. बाकी मला त्या ठिकाणी ना बोलावण्यात येईल ना मी जाणार. जर मी त्या ठिकाणी गेलो तर अनेकांच्या दुकानांना टाळी लागतील,” असंही ते म्हणाले.
“राम मंदिराचे भूमिपूजन हा माझ्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि भावनिक क्षण होता. माझ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करणं हे माझं कर्तव्य समजतो. माझ्या गुरू परंपरेनं हा संकल्प अनेक दशकांपूर्वी पाहिलेला. तो आता साकार झाला आहे. मंचावर असलेले लोकं राम जन्मभूमीसोबत आत्मियतेनं जोडले गेलेले आहेत. हा आमच्यासाठी नक्कीच उत्साहाचा दिवस होता,” असंही योगी आदित्यनाथ आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”