उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर ओक्साबोक्शी रडणाऱ्या एका पोलिस हवालदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा पोलीस हवालदार मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाविरोधात (substandard food served) आवाज उठवताना दिसत आहे. वरिष्ठांना सांगूनही कुणी दखल घेत नसल्यामुळे आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न या पोलीस शिपायाला पडला आहे. 12 तास ड्युटी केल्यानंतर मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा (substandard food served) किती खालावला आहे, यावर पोलीस शिपायाने प्रश्न उपस्थित केला आहे. जेवणाऱ्या दर्जावरुन (substandard food served) आंदोलन करणाऱ्या या पोलीस शिपायाचा व्हिडीओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘कुत्रही नाही खाणार हे असलं…’ पोलिसांचं जेवणं आपली व्यथा मांडताना ढसाढसा रडला पोलीस pic.twitter.com/O3lkqt3eXW
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 11, 2022
कोण आहे पोलीस शिपाई ?
मनोज कुमार असं जेवणाबाबत व्यथा मांडणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. त्यानं अनेक जेवणाऱ्या (substandard food served) निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. पण कुणीही त्यावर दखल घेतली नाही. वरिष्ठांना फोनवरुनही संपर्क केला, पण कुणीच ऐकून घेत नाही. उलट निलंबन करण्याची धमकी दिली. पोलीस शिपायांना दिलं जाणारं हे जेवणं (substandard food served) इतकं वाईट आहे, की कुत्रही त्यांना तोंड लावणार नाही, असं मनोज कुमार यांनी म्हटलं आहे. तसेच पोषण आहाराच्या नावाखाली घोटाळा सुरु असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
हा सगळा प्रकार पाहून स्थानिक पोलिसांनी शिपायाला पोलीस ठाण्यात चल, तिथे तुझं म्हणणं मांड, असं म्हणत त्याची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा पोलीस काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. उपस्थित लोकांनी या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल करताच फिरोझाबाद पोलिसांनी याची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणाना याप्रकरणी दखल घेण्याचे निर्देश दिले आहेत.
हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…