हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाण्यास सर्वांनाच मज्जाव केला आहे. याठिकाणी नेते आणि मीडियाला सुद्धा तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यातच तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवारी पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आम्ही पीडित कुटुंबीयांना भेटणारच यावर अडून राहिलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन हे पोलिसांच्या धक्काबुक्कीत खाली कोसळले.
https://twitter.com/ANI/status/1311925656586915840?s=20
आम्हाला जाऊ द्या, आम्ही सर्व नियमांचे पालन करू, अशी विनंती तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने पोलिसांना केली. तरीही, पोलिसांनी त्यांना जाण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतरही पीडित कुटुंबाला भेटायला जाण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ ठाम राहिले. यावेळी खासदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर झालेल्या धक्काबुक्कीत खासदार डेरेक ओ ब्रायन यांचा तोल जाऊन खाली कोसळले.
A TMC delegation, including Derek O'Brien, stopped at Hathras border. They were on their way to meet the family of the victim of #Hathras incident. pic.twitter.com/v1fYKsqfh5
— ANI (@ANI) October 2, 2020
हाथरसमध्ये पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी केले असता उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार ममता ठाकूर यांनी केला आहे. आम्ही पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात होतो, मात्र आम्हाला परवानगी देण्यात आली नाही. ज्यावेळी आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी गैरवर्तन करत धक्काबुक्की केली आणि प्रतिनिधी मंडळावर लाठीचार्ज केला, असे खासदार ममता ठाकूर यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’