आगामी निवडणुका स्वबळावर `कमळ` चिन्हावर लढणार, आघाडी नाही : डाॅ. अतुल भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसह सर्वच निवडणुका भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढणार आहे. कराड नगरपालिकेत 31 जागांवर `कमळ` चिन्हावर उमेदवार उभे राहतील, तेथे कोणाशीही आघाडी करणार नाही. तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक लागल्यास तेथेही भाजपाचा उमेदवार उभा असेल, असे सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले यांनी आज स्पष्ट केले.

कराड येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डाॅ. अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासून सर्वच ठिकाणी भाजप पक्ष वाढविण्यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या सर्वच निवडणुका आमचा पक्ष `कमळ` चिन्हावर निवडणूक लढेल. त्यानंतर सत्ता स्थापन करताना काय निर्णय घ्यायचा किंवा कोणासोबत आघाडी करायची तो प्रश्न त्या- त्यावेळी बघितला जाईल. मात्र, निवडणुका या स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावरच लढविल्या जातील.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात येईल. पक्ष वाढीच्या दृष्टीने जे आदेश पक्षाकडून तसेच पक्षश्रेष्ठीकडून येतील, त्यानुसार पुढील भूमिका आमची सातारा जिल्ह्यात असणार आहे. परंतु आम्ही निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी किंवा स्थानिक आघाड्यांशी आघाडी करणार नसल्याचे डाॅ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.

शिंदे गट सोबत घ्यायचा की नाही

राज्यात सध्या शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. शिंदे गट सातारा जिल्ह्यात निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी करत आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. परंतु सध्या तरी आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. तसेच प्रस्ताव आल्यास विचार होईल, परंतु अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल. त्यानुसार शिंदे गट सोबत घ्यायचा की नाही हे ठरेल, असेही डाॅ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment