बहुचर्चित ‘तान्हाजी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला आणि अजय देवगण अभिनय करत असलेला ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘लोकमान्य’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याने ‘तान्हाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण हा नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका करत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री काजोल हि सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत असून उदयभानच्या भूमिकेमध्ये सैफअलीखान  आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तान्हाजी मालुसरे यांची  ही शौर्यगाथा ‘3 डी’ मध्ये बघायला मिळणार आहे.

Tanhaji: The Unsung Warrior - Official Trailer | Ajay D, Saif Ali K, Kajol | Om Raut | 10 Jan 2020

दरम्यान तान्हाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र होते. तसेच ते मराठा साम्राज्याचे वीर सुभेदार होते. स्वराज्य स्थापनेच्या काळात कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. तेव्हा आपल्या मुलाचं लग्न अर्धवट सोडून त्यांनी “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे” म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली होती. यानंतर शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” या शब्दांत तान्हाजींच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते.

तसेच या सिनेमाच्या निमित्ताने 12 वर्षांनंतर अजय देवगण आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एका सिनेमात दिसणार आहेत. याआधी त्यांनी ओमकारा या सिनेमात सोबत काम केले होते. दरम्यान पुढील वर्षी १० जानेवारी २०२० रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment