नवी दिल्ली । रविवारी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या युझर्सना सर्व्हर डाउनमुळे काही काळ डिजिटल ट्रान्सझॅक्शनमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता UPI सर्व्हिस कार्यान्वित झाली आहे.
याआधी ट्विटरवर अनेकांनी ट्विट करून UPI सर्व्हर सुमारे तासभर डाऊन असल्याची तक्रार केली होती. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या UPI Apps च्या ट्रान्सझॅक्शनमध्ये समस्या येत असल्याचे अनेक युझर्सनी सांगितले.
UPI विकसित करणार्या NPCI ने ट्विट केले की, “तांत्रिक समस्यांमुळे UPI युझर्सना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत . UPI सर्व्हिस आता कार्यान्वित झाली आहे आणि आम्ही सिस्टीमचे बारकाईने निरीक्षण करत आहोत.”
Regret the inconvenience to #UPI users due to intermittent technical glitch. #UPI is operational now, and we are monitoring system closely.
— NPCI (@NPCI_NPCI) January 9, 2022
UPI म्हणजे काय ?
UPI ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे, जी मोबाईल अॅपद्वारे बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. डिजिटल पेमेंटसाठी UPI सारखी सुविधा तुम्हाला घरबसल्या सहजपणे पैसे ट्रान्सफर करू देते. यासाठी तुम्हाला फक्त पेटीएम, फोनपे, भीम, गुगल पे इत्यादी UPI सपोर्टिंग अॅप्सची गरज आहे.
UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते एकापेक्षा जास्त UPI अॅप्सशी लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी यापैकी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देतो.