मागील वर्षी UPSCचा शेवटचा प्रयत्न दिलेल्यांना आणखी एक संधी नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेकांना UPSCचा शेवटचा प्रयत्न देण्यास अडचण आली होती. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी UPSCचा शेवटचा प्रयत्न दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी नाकारली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोंबर २०२० साली यूपीएससीची परीक्षा घेण्यात आली होती. अशा विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त प्रयत्न मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यावर निवेदन द्यायला सांगितलं होतं. सुरुवातीला या अशी एक संधी नाकारणाऱ्या केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्रक सादर करताना अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यायला सरकारची हरकत नसल्याचं सांगितलं होतं.

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुरु होती. या सुनावणीत यूपीएससीचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्यांना आणखी एक अतिरिक्त संधी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आम्ही ही याचिका फेटाळतो असे या खंडपीठातील एक न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment