हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या बाजारामध्ये विविध कंपन्या आपल्या खास फीचर्ससह टू व्हीलर, फोर व्हीलर लाँच करत आहेत. यात मधल्या काळात TVS Motors च्या TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता चांगलीच वाढलेली दिसत आहे. त्यामुळेच कंपनीने या स्कूटरवर ग्राहकांना मोठी सूट ऑफर केली आहे. ही सूट तब्बल 40 हजारापर्यंत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या पर्यायांमध्ये ग्राहक TVS iQube ची निवड करत आहेत. आज आपण याच स्कूटर मधले फीचर्स जाणून घेणार आहोत.
TVS iQube सर्वात स्वस्त किमतीत उपलब्ध
बाजारामध्ये आलेल्या बऱ्याच इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सर्वसामान्यांना परवडण्याच्या बाहेर आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला TVS iQube स्कूटर सर्वात स्वस्त दरात खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्कूटरवर सध्या चाळीस हजारांपर्यंत सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ही स्कूटर फक्त 1.10 लाखांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. यापूर्वी TVS iQube स्कूटरची किंमत कंपनीने 1.10 च्या वर लावली होती. परंतु आता याच स्कूटरवर सूट देण्यात येत आहे.
TVS iQube च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या स्कूटरमध्ये 3.4 kWh बॅटरी आहे. जी एकदा चार्ज केल्यावर तुम्हाला 100 किलोमीटरची रिअल-वर्ल्ड रेंज देईल. त्यावेळी या स्कूटरची टॉप स्पीड 82 किलोमीटर प्रति तास असेल. खास म्हणजे, TVS iQube मध्ये 32 लीटर अंडर सीट स्टोरेज देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करायचा असेल तर तुमच्यासाठी TVS iQube चांगला पर्याय ठरू शकतो.