इंदौर । लोकप्रिय शायर राहत इंदौरी कोरोना यांना कोरोनाची लागण झल्याची माहिती समोर येत आहे. मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये त्यांना रात्री उशिरा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.तेथे त्यांच्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समजत आहे. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राहत इंदौरी यांनी इंदौरच्या ऑरबिंदो रूग्णालयात दाखल केलं आहे. जे रुग्णालय कोविड स्पेशव असून आता त्यांची प्रकृती ठिक आहे. काळजीचं कोणतंच कारण नाही असं सतलज इंदौरी यांनी सांगितलं. दरम्यान, राहत इंदौरी यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘कोरोनाची सुरूवातीची लक्षण दिसू लागल्यामुळे मी कोरोनाची चाचणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ऑरबिंदो रुग्णालयात मला दाखल केलं आहे. प्रार्थना करा मी लवकरात लवकर कोरोनावर मात करेन. आणखी एक विनंती आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना फोन करू नका. माझ्या तब्बेततीची माहिती तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळेल.’ शायर राहत इंदौरी हे करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी या अगोदर धावून आले होते. त्यांनी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यास स्वतःच घर देखील वापरण्यास देण्याची तयारी दर्शवली होती.
कोविड के शरुआती लक्षण दिखाई देने पर कल मेरा कोरोना टेस्ट किया गया, जिसकी रिपोर्ट पॉज़िटिव आयी है.ऑरबिंदो हॉस्पिटल में एडमिट हूँ
दुआ कीजिये जल्द से जल्द इस बीमारी को हरा दूँएक और इल्तेजा है, मुझे या घर के लोगों को फ़ोन ना करें, मेरी ख़ैरियत ट्विटर और फेसबुक पर आपको मिलती रहेगी.
— Dr. Rahat Indori – forever (@rahatindori) August 11, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”