आता लघवी तपासणीतून करोनाची तीव्रता समजू शकेल; संशोधनामधून आले समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करोनची लागण झाल्यानंतर झालेला करोना हा किती तीव्र आहे यानुसार, त्यावरील उपचार पद्धती ठरवली जाते. करोना साधारण तीन प्रकारच्या तीव्रतेमध्ये दिसून येतो. यामध्ये काही रुग्णांमध्ये सोम्य काहींमध्ये मध्यम तर काही जणांमध्ये तीव्र लक्षणे आढळतात. या लक्षणानुसार रुग्णांवरती उपचार केले जातात. या निदान पद्धतीमध्ये रुग्णांची लघवी तपासणी ही खूप महत्वाची गोष्ट ठरनार आहे. व यातून उपचारांसाठी चांगली दिशा मिळनार आहे. सोबतच आजाराची तीव्रता कळून येण्यास मदतही होनार आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

वेन स्टेट युनिव्हर्सिटी या अमेरिकेतील डेट्रॉईटमधील युनिव्हर्सिटीमधील संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यास संशोधनामध्ये वरील संशोधन समोर आले आहे. या संशोधनामध्ये निरोगी तसेच संसर्ग असलेल्या व्यक्तींच्या तुलनेमध्ये करोणाची लागण झालेल्या ुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्‍ती वाढून आल्याचे दिसून आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी तपासणी नमुने घेण्यासाठी संशोधकांनी करोणा बाधित रुग्णांचे मूत्र घेण्याचे ठरवले. यामुळे रुग्णांना सुई अथवा कुठल्याही शरीराचा त्रास होणार नसल्याने ही नमुना पद्दती सोपी आणि उपयुक्त मानली जात आहे.

पीएनएएस या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार यामधील पथकाने अल्फाकस या दक्षिण अमेरिकेतील प्राण्यांवर या अनुषंगाने प्रयोग सुरू केले आहेत. संशोधन यामधील नॅनो बॉडीज ची निर्मिती व्हावी असा या संशोधनाचा उद्देश आहे. यामुळे अनेक रुग्णांना मोठा दिलासा भविष्यकाळात मिळणार असून, त्रास विरहित तपासणी नमुने आणि लवकरात लवकर निष्कर्ष यामुळे यावरील संशोधन हे महत्त्वाचे ठरणार आहे.

You might also like