हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा काल सोमवारी अहमदाबादमधून सुरू झाला. यानंतर त्यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. दरम्यान आज दिल्लीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकत्व कायद्याबाबत आणि दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत केलेल्या प्रश्नांला स्पष्टपणे उत्तर दिले. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, ”मी दिल्ली हिंसाचाराबद्दल ऐकले आहे, परंतु पंतप्रधान मोदी यांच्याशी याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. ते म्हणाले की, ”पंतप्रधान मोदींसोबत धार्मिक स्वातंत्र्याबाबत चर्चा केली गेली आहे आणि ते धार्मिक स्वातंत्र्याच्या बाजूने आहेत. ट्रम्प पुढे म्हणाले की, ”सीएएबाबत मला कोणतेही विधान करणार नाही, कारण हा भारताचा निर्णय आहे आणि मला आशा आहे की भारत स्वत: साठी योग्य ती पावले उचलत योग्य तो निर्णय घेईल.”
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.